ग्रामस्थ, अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

  • ग्रामपंचायात जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आश्‍वासन

सोमेश्‍वरनगर – गावठाणमधील ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीसमोर अजित जाधव व जयप्रकाश राऊत यांनी सुरू केलेले उपोषण पंचायत समिती अधिकारी व ग्रामस्थांच्या मध्यस्थिने सोडवण्यात आले.
जयप्रकाश राऊत म्हणाले की, घरासमोरील ग्रामपंचायत जागेत ग्रामपंचायत सदस्याने शेड बांधुन अतिक्रमण केले आहे. गेल्या वर्षी हे अतिक्रमण हटवण्याबाबत उपोषण धरले होते. यावेळी अतिक्रमण काढू असे आश्‍वासन दिले. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेने हे अतिक्रमण काढावे असे ग्रामपंचायतीला कळवले असूनही ग्रामपंचायतीने ते काढले नाही. सदस्याला ग्रामपंचायत पाठीशी घालत आहे. हे अतिक्रमण त्वरीत काढावे यामागणीसाठी उपोषण धरले होते. अजित जाधव म्हणाले की, आपल्या जागेत शेजाऱ्याने अतिक्रमण करूण बांधकाम चालवलेले आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केल्या पण दखल घेतली नाही. पंचायत समितीकडे तक्रार केली होती, पण काही उपयोग झाला नाही. बांधकाम थांबवण्याबाबत कोणतीही कडक पावले उचलली नाही. बांधकाम थांबवावे जागा मोकळी करून द्यावी या मागणीसाठी उपोषण धरले होते. ग्रामपंचायतीसमोर दोन्ही व्यक्ती उपोषणासाठी बसल्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय खंडाळे व वाघ दोन्ही अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांचे मत जाणून घेतले उन्मेश शिंदे, सुनिल माने, मनोजकुमार साळवे, दत्तात्रेय खोमणे, अजित भोसले, बाळासो शिंदे, भिमराव साळुंके, प्रकाश जाधव, प्रशांत दरेकर ग्रामसेवक स्वाती ताकवले, जितेंद्र साळुंके यांनी चर्चेत सहभाग घेऊन मध्यस्थी केली. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळताच अतिक्रमणे हटवली जातील असे लेखी अश्‍वासन दिल्याने या दोघांनी उपोषण सोडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)