ग्रामसभेत बारसाठीचे 11 प्रस्ताव महिलांच्या पुढाकारामुळे मंजूर

गोंदवले, दि. 30 (वार्ताहर) – ढाकणी, ता. माण येथे मंगळवारी झालेल्या ग्रामसभेला बियरबार, परमिटरूम व लॉजिंगला युवकांनी विरोध दर्शविला. मात्र, गावात बाटली उभी करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेत 108 विरूध्द 78 ने ठराव मंजूर केला. यामुळे ग्रामसभेची तालुक्‍यात चर्चा आहे.

ढाकणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी पार पडली. यावेळी बियर बार परमिट रूम व लॉजिंग हा महत्वाचा विषय घेण्यात आला होता. यावेळी 11 ग्रामथांनी बियर बारसाठी अर्ज केले होते. त्यास तरूणवर्गाने कडाडून विरोध केला होता. मात्र, उपस्थित महिलांनी या प्रस्तावास पाठिंबा दिला. तरुणवर्गाचा विरोध मोडून महिलांच्या पाठिंब्यामुळे प्रस्तावास सहमती मिळाली. त्यामुळे हा ठराव बहुमताने मान्य झाला. ग्रामसभेत सतीश सुर्यवंशी, अमोल नरबट, रवींद्र खाडे आदी गावातील तरुणांनी दारू विषयावर मनोगत वक्त करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
राज्यात आजपर्यंत अनेक ठिकाणी बाटली आडवी करण्यासाठी महिला पुढाकार घेताना दिसून येत होत्या. मात्र, ढाकणीत बाटली उभी करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत ठराव आपल्या बाजूने मंजूर केला असून याची चर्चा तालुकाभर रंगतदारपणे केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)