ग्रामपंचायत विभाजनासाठी खर्डा बंदला उस्फूर्त प्रतिसाद

जामखेड – तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीच्या विभाजन करण्याचा मुद्दा कळीचा ठरला आहे. ग्रामसभेत मंजूर झालेला विभाजन ठराव काही ग्रामपंचायत सदस्यांच्या बदल्या भूमिकाने बारगळण्याची चिन्हे दिसून लागल्याने शिवपट्टण विकास युवा मंच कार्यकर्त्यांनी खर्डा गाव बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज रविवार खर्डा शहर शंभर टक्के कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद दिला. खर्डा ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आयोजक करण्यात आलेली विशेष ग्रामसभा वादळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्या सोमवार दि. 24 रोजी ग्रामपंचायत विभाजनासाठी होणारी विशेष ग्रामसभाही वादळी होण्याची चिन्हे दिसत असून याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन ग्रामपंचायत विभाजनासाठी आग्रही असलेल्या खर्डा येथील तरूण व ग्रामस्थांची भूमिका समजून घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. खर्डा येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत विभाजनाच्या ठरावाला पाठिंबा देऊन काही ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका बदलून ग्रामपंचायत विभाजनाला विरोध केल्याच्या निषेधार्थ आज खर्डा शहर बंद पुकारण्यात आला होता.
खर्डा बसस्थानक परिसरात प्रवाशांचे गैरसोय होऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांनी चहा व पाण्याचा जार पिण्यासाठी उपलब्ध केला होता. यावेळी शांततेत पार पाडण्यासाठी खर्डा पोलीस सहा निरीक्षक महेश जानकर, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल बडे, पोलीस कॉन्स्टेबल मस्के पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.





