ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नितीन गडकरींना कॉंग्रेसचा धक्का

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने दणका दिला आहे. गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा आणि त्यांनी दत्तक घेतलेले पाचगाव या दोन्ही गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे, गडकरींच्या मूळ गावात भाजपला खातेसुद्धा न उघडता आलेले नाही.

धापेवाडा येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत कॉंग्रेस पुरस्कृत सुरेश डोंगरे यांनी भाजप पुरस्कृत संजय शेंडे यांचा पराभव केला आहे. तर पाचगाव येथे कॉंग्रेसच्या उषा गंगाधर ठाकरे यांनी भाजप समर्थित रजनी लोणारे यांचा पराभव करून सरपंचपदावर शिक्कामोर्तब केले आहे. पाचगाव येथे भाजप पुरस्कृत लोणारे यांना गटबाजीचा जबरदस्त फटका बसल्याचे सांगितले जात आहे. येथे भाजपच्या 4 बंडखोर महिला रिंगणात होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)