ग्रामपंचायत कर्मचारी वेतन आयोगासाठी आवाज उठवणार

आमदार दत्तात्रय भरणे : इंदापुरात ग्रामपंचायत संघटनेच्या नामफलकाचे उद्‌घाटन

रेडा- राज्यातील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होतो. राज्य सरकारची सेवा करण्याचा भाग ग्रामपंचायत स्तरावर जे कर्मचारी म्हणून काम करतात, हे प्रमाणिकपणे सेवा करतात. परंतु त्यांना वेतन आयोग लागू केला जात नाही. परंतु शासनदरबारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यासाठी आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या नामफलकाचे उद्‌घाटन व 25व्या वर्धापनदिनानिमित्त मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बारामती लोकसभा अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील,महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे संस्थापक सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, संस्थापक अध्यक्ष धनाजी ढावरे, सचिव सुभाष तुळवे, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गणेश वाघ, सत्यवान कुंभार वैभव कोरे, अशोक मोहिते, प्रकाश राऊत, राजेंद्र ओव्हाळ, अनिल सांगडे, धनसिंह जाधव, हनुमंत पोळ, संतोष तुपे, नारायण घाणेकर, शहाबुद्दीन तांबोळी, सुनिता लांडगे, मनीषा केदारी, खंडोजी घोटकुले, सुजाता अल्लाट, गणेश सांगळे, कर्मचारी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विम्याचे कवच अत्यावश्‍यक आहे त्यामुळे तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायतीमार्फत विमा सुरू करावा. तालुक्‍यातील अनेक नेते मोठ्या गप्पा मारतात. परंतु मी गप्पा मारण्यापेक्षा कामावर भर देतो. त्यामुळे भरणे परिवाराच्या वतीने इंदापूर कर्मचारी संघटनेसाठी पंचवीस हजार रोख रकमेची मदत केली आहे.

ज्ञानोबा घोणे, धनाजी ढावरे यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे तालुकाध्यक्ष नीलकंठ गिरी, उपाध्यक्ष संजय यादव, सचिव लक्ष्मीकांत जगताप, सदस्य गणेश वाघ,सत्यपाल कुंभार, वैभव कोरे, प्रकाश राऊत यांनी स्वागत केले. इंदापूर तालुक्‍यातील कर्मचाऱ्यांचा विमा सोनाई परिवार स्व:खर्चातून उतरवणार असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.