ग्रामपंचायतीत भाजपचेच वर्चस्‍व

पवनानगर – मावळ तालुक्‍यातील झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता काबिज केली आहे. गेव्हंडे-ठाकूरसाईच्या सरपंचपदी नारायण बोडके (भाजपा), डोंगरगाव- केवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील येवले (शिवसेना), तुंग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वसंत बोडके (भाजपा), चावसर-केवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ कुडले (भाजपा) यांनी आपापल्या विरोधकांचा पराभव करत विजयमाला परिधान केली आहे. पवन मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला असून ठाकूरसाई, गेव्हेडे तुंग व चावसर या तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा या भागात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

मिळाली संधी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडगाव नगरपंचायतीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने मावळ तालुक्‍यात भाजपाचे वर्चस्व कमी झाल्याचे चर्चांना उधाण आले होते. यामुळे चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी असल्याचे मानत पुन्हा एकदा जोर लावला होता. या तीनही ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याने भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.

मावळातील ग्रामपंचायत निकाल व सरपंच पुढीलप्रमाणे

ठाकूरसाई- गेव्हंडे ग्रुप ग्रामपंचायत:- सरपंचपदी नारायण बोडके (239),
प्रभाग क्रमांक:- 1- निर्मला राजेंद्र भोसले (90), अरविंद नारायण रोकडे (बिनविरोध),
प्रभाग:- 2- रामदास लक्ष्मण खैरे (104), रेखा रामदास ठाकर (110),
प्रभाग:- 3- कमल ज्ञानदेव मानकर, धर्मेंद्र निवृत्ती ठाकर (दोघेही बिनविरोध), एकजागा रिक्त

केवरे-डोंगरगाव ग्रामपंचायत :- एकूण नऊ जागा पैकी दोन जागा बिनविरोध तर सरपंचपदी शिवसेनेचे सुनिल बाळकृष्ण येवले (456)
प्रभाग क्रमांक:- 1- शुभांगी विश्वास कोळसकर (291),
जयश्री राजेंद्र दळवी (269), प्रदीप गंगाराम घोलप (300).
प्रभाग क्रमांक:-2- सतीष श्रीरंग चव्हाण (226), अनिता अनंत दळवी (226), राजश्री राजेश जोगले (बिनविरोध).
प्रभाग क्रमांक :-3- सविता दिनेश जायगुडे (320), सुनिता सुभाष खोले (244), ज्ञानेश्वर महादू वाघमारे (बिनविरोध)

तुंग ग्रामपंचायत :- सरपंचपदी वसंत नथू म्हसकर(411), सिताबाई दगडू लोहेकर (103), शुभांगी संदिप पाठारे (121)
प्रभाग क्रमांक :-2- विलास लक्ष्मण वाघमारे (147), शांताराम सतू पाठारे (150), शांताबाई नामदेव पांगारे (139), प्रभाग :-3- शंकर भागू आखाडे (140), उषा राघू ठोंबरे (145)

चावसर-केवरे :- सरपंचपदी नवनाथ बबन कुडले (318),
प्रभाग क्रमांक :-1- रघुनाथ शंकर पवार, कांताताई नारायण पवार (दोघे बिनविरोध),
प्रभाग :-2- भाऊ चिंतू पवार (134),
सुवर्णा संतोष राऊत, पल्लवी संजय गोणते (बिनविरोध),
प्रभाग क्रमांक :- 3- सखुबाई भाऊ पवार, भाऊ रोंघु दळवी (बिनविरोध)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)