गोव्यात झालेल्या मैदानी स्पर्धांमध्ये मोहिते प्रशालेचे यश

अकलूज- शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर या शाळेतील विद्यार्थांनी युथ स्पोर्टस डेव्हलपमेंट ऑफ इंडिया यांचे वतीने पणजी (गोवा) येथे नुकत्याच झालेल्या धावणे स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. या स्पर्धेत सूर्यजीत इंगवले (100 मी. -द्वितीय), ओंकार दुपडे (100 मी. – प्रथम), प्रियंका जाधव (100 मी. – प्रथम), ललिता खेडकर (200 मी. – प्रथम), महंमद मुजावर (400 मी. – प्रथम), श्रध्दा सोनवले (800 मी. – प्रथम) क्रमांक मिळवून यश संपादन केले.
याबरोबरच महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या वतीने पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये नागेश दत्तात्रय सुतार याने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले. या विद्यार्थांचा आणि मार्गदर्शक शिक्षक, एस. एस.माने, ए. पी. जाधव, ए. एस. शेळके, प्रदीप पांढरे, मुख्याध्यापक एल. डी. मगर आणि पालकांचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)