“गोविंद’च्या गायीच्या दुधात भेसळ

नेवासे येथे कारवाई : तीन हजार लीटर दूध नष्ट

नगर – गोविंद ऍग्रो फूड प्रोडक्‍टचे नेवासे येथील बांगडीवाला ऍग्रो प्रॉडक्‍टस्‌ प्रा. लिमिटेडमधून पॅकिंग करून वितरत होत असलेल्या गायीच्या दुधात भेसळ असल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने या भेसळीच्या दुधावर छापा घालून ते नष्ट केले आहे. सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांनी या माहितीला दुजोरा दिला. “गोविंद’चे नेवासे येथील बांगडीवाला ऍग्रो प्रोडक्‍टस्‌ पॅकिंग होऊन वितरीत होत असलेल्या गायीच्या दुधात स्किम मिल्क पावडरीची भेसळ होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी कालिदास शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी आदिनाथ बाचकर यांनी नेवासे येथील बांगडीवाला ऍग्रो प्रोडक्‍टस्‌वर छापा घातला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी येथील दुधाची तापसणी केल्यावर त्यात स्किम मिल्क पावडर आढळली. बांगडीवाला ऍग्रोचे सुपरवायझर यानेही दुधात पावडर मिसळत असल्याची माहिती दिली. तसा सुपरवायझर याचा जबाब नोंदविला असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

गायीच्या दुधात स्किम मिल्क पावडरीच्या भेसळीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुमारे 6 हजार 40 पॅकिंग पिशव्यातील सुमारे 3 हजार 10 लीटर दूध नष्ट केले. या दुधाची किंमत सुमारे 1 लाख 32 हजार 440 रुपये एवढी आहे. अन्न व औषध प्रशासनाने येथील दुधाचे नमुने ताब्यात घेतले आहे. प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी हे दूध पाठविले असून, तेथील अहवालानंतर पुढील फौजदारी कारवाई प्रस्तावित होईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)