गोरक्षणासाठी होणाऱ्या सामुहिक हत्याकांडामुळे पुन्हा फाळणी होईल

श्रीनगर – गायींच्या तस्करीच्या आरोपावरून मुस्लिमांची समुहाकडून हत्या होणे यापुढील काळात थांबल्या नाहीत, तर आणखी एक फाळणी होण्याचा धोक्‍याचा इशारा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आणि लोकसभेतील खासदार मुझफ्फर हुसैन बेग यांनी दिला आहे. “पीडीपी’च्या 19 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अलिकडेच गोरक्षकांच्या मारहाणीमध्ये झालेल्या मृत्यूच्या संदर्भाने बोलताना बेग यांनी हा इशारा दिला.

“1947 साली देशाची एकदा फाळणी झाली आहे. गाय वाचवण्याच्या निमित्ताने होणाऱ्या या हत्या थांबल्या पाहिजेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. या हत्या थांबल्या नाहीत, तर आणखी एकदा देशाची फाळणी होईल.’ असे बेग म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पीडीपी’ने भाजपबरोबरची आघाडी सत्तेसाठी केलेली नव्हती. तर देशभरातील मुस्लिमांना आणि काश्‍मीरी नागरिकांना न्याय मिळावा यासाठी केली होती. तसेच पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी. भाजप मुस्लिमांवर विश्‍वास ठेऊ शकत असल्यानेच ही आघाडी आम्ही केली होती, असेही बेग म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)