गोमती विकास प्राधिकरणातील गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे छापासत्र 

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमध्ये तपास सुरु 

लखनौ/ नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गोमती खोरे विकास प्राधिकरणातील 1,500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाने आज काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे घातले. या प्रकरणातील आरोपींशी संबंधित असलेल्या लखनौ (उत्तर प्रदेश), (नोएडा) दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमधील ठिकाणांवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने “ईडी’च्या पथकाने हे छापे घातले गेले. या छाप्यांदरम्यान या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि कागदपत्रांचा शोध घेतला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोमती खोरे विकास प्राधिकरणातील गैरव्यवहारासंदर्भात सीबीआयने आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण दाखल केले आहे. गोमती नदी खोरे सुशोभिकरण प्रकल्प उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या सरकारच्या काळात सुरु झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यावर योगी आदित्यनाथ यांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

अलाहबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आलोक कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही नियुक्‍त केली होती. त्या समितीला या प्रकरणात गैरव्यवहार असल्याचे सकृतदर्शनी आढळले होते. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयने दाखल केलेल्या “एफआयआर’ची दखल घेऊन “ईडी’ने हे प्रकरण दाखल करून घेतले आहे. सीबीआयने तत्कालिन मुख्य अभियंत्यासह तत्कालिन अधिक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंत्याविरोधात “एफआयआर’ दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)