गुढीपाडव्यानिमित्त संजीवन समाधीला साखेच्या गाठीने सजविले
आळंदी- गुढीव्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीला साखेरेच्या गाठीने सजविण्यात आले होते. माऊलींचे हे “गोड गोजिरे माऊलींचे रुप साजिरे’ हे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी माऊली मंदिरात गर्दी केली होती.
गुढीपाडव्यानिमित्त माऊलीं सुंदर, सुगंधी तुळशी माळा, रंगीबेरंगी फुले व अत्तरयुक्त वस्त्रांसह साखरेच्या गाठींनी सजवण्यात आले होते. दरम्यान, आज मंदिरात पहाटे पासुन नित्याचे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन भाविकांसाठी दर्शनबारी खुली करण्यात आली होती. गुढीपाडव्या शुभमुहूर्तावर व मराठी नववर्षाच्या शुभारंभाप्रसंगी आळंदीतील योगिराज ज्वेलर्स, मॉल मार्ट, शुभांगी कम्युनिकेशन आदीं ठिकाणी ग्राहकांसाठी विशेष आकर्षक भेट वस्तू तसेच गुढीपाडवा ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या.