गोंदावले मंदिरावर जीवदेण्यास चढला मनोरुग्ण

गोंदावले वार्ताहर

आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर झालेल्या अन्यायाला पोलिसांनी न्याय न दिल्याच्या कारणावरून आज ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या मंदिरावरील शिखरावर चढून एका मनोरुग्ण प्रवृत्तीच्या इसमाने दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . त्याला वाचवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले. मात्र त्याने ब्लेडच्या साहाय्याने गळ्यावर वार करून घेतले . उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात पुणे येतील असणाऱ्या देहूगाव येतील राजू आर. कदम आला होता . प्रथम त्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले . दुपारी आरतीला पण तो आला होता . त्यानंतर दुपारी मंदिर परिसरात गर्दी नाही असे बघून त्याने मंदिरावर चढण्यास सुरुवात केली . पहिल्यांदा पत्रयावर चढला. यावेळी त्याला अटकाव करण्यास सुरुवात केली. त्याने माझी पाचशे रुपयांची नोट वाऱ्या ने वर गेली आहे असे सांगत तो लोखंडी शिडी वरून वर चढला . यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होऊ लागली . पोलिसांना फोन करून बोलवण्यात आले. तीन वाजण्याच्या सुमारास दहिवडी चे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आपल्या अन्य सहकार्याच्या सह मंदिरात दाखल झाले. त्याला समजावू लागले . मात्र त्याने ऐकले नाही. तो वारंवार काही ही मागण्या करू लागला . त्यानंतर त्याने माईक ची मागणी केली. त्यावरून तो त्याची अडचण सांगणार होता. माईक देऊन ही तो खाली यायचं नाव घेत नव्हता.

सतत तो मी उडी मारणार अशी धमकी देत होता. पोलिसांनी मग म्हसवडच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले . रुग्णवाहिका ही तैनात ठेवली होती . मंदिराच्या खाली माण खटाव चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तहसीलदार माने उपस्थीत होते. प्रांताधिकारी कांबळे यांनी सांगून सुद्धा यो ऐकत नव्हता. मंदिराच्या शिखरावर कोणी जाण्याचा प्रयत्न केला की , तो माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यात पोलिसही सामील आहेत. त्यामुळे माझा कोणावरही विश्वास नाही . निषेध करण्यासाठी गोंदवल येथे आलो आहे असे ओरडायचा . उपस्थतितांची यावेळी भंबेरी उडाली होती.

दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे तातडीने घटनास्थळी आले.त्यांनीही त्याला खाली येण्याची विनंती केली मात्र तो काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता लागला.त्यानंतरही विभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,अंगराज कट्टे,श्रीकृष्ण कट्टे,सचिन पाटोळे यांच्यासह अनेक युवकांनी कदम याला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही देऊन खाली उतरण्याची विनंती केली.परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर शिखराच्या चारी बाजूला कापडी जाळीचे
कापड बांधण्यात आले.

काही युवक थेट शिखरावर चढले.त्यावेळी गोंधळला कदम शिखराच्या टोकावर जाऊन बसला.मात्र युवकांनी धाडसाने त्याला पकडले. त्याने खिशात आणलेल्या ब्लेडने स्वतःच्याच मानेवर व गळ्यावर वार केले . त्यावेळी त्याला पकडून ठेवलेल्या युवकांनी मोठया शिताफीने त्याच्या हातातून ब्लेड काढून घेतले.त्याला दोरीने बांधण्यात आले.मात्र दोरी सोडवून त्याने थेट खाली उडी घेण्याचा प्रयत्न केला.तरुणांनी मात्र त्याचा पाय घट्ट धरून ठेवल्याने त्याचा हाही प्रयत्न फसला.प्रतिकाराला न जुमानता हळू हळू त्याला खाली घेण्यात आले.आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.ब्लेडने वार केल्याने रक्तबंबाळ झाल्याने तातडीने दहिवडी ग्रामीण रुग्णालय व नंतर सातारा येथील दवाखान्यात नेण्यात आले.

आज श्री क्षेत्र गोंदवले येतील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरावर अतिशय आखीव रेखीव कळस असून हा कळस सुमारे तीस फूट उंचीचा आहे त्या कळसावर कोरीव काम केलेले असून कोरीव खिडक्‍या असून प्रत्येक खिडकीवर नक्षीकाम आहे त्यावर पितळी अणकुचीदार छोटे छोटे कळस आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)