गोंदवल्यात आजपासून नाट्यमहोत्सव

दि. 27 ते 17 सप्टेंबरपर्यंत दर्जेदार नाटके होणार सादर
गोंदवले- गोंदवले खुर्द, ता. माण येथे गोंदवलेकर ग्रामस्थ नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव उद्या सोमवार, दि 27 ऑगस्टपासून 17 सप्टेंबरपर्यत चालणार आहे. यामध्ये दर्जेदार नाटके सादर होणार आहेत.

गोंदवले खुर्द येथे नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या सोमवारी सायंकाळी आठ वाजता उद्‌घाटन होणार आहे. या उद्‌घाटनासाठी “लागीर झालं जी’ फेम रविंद्र डांगे, संदीप जंगम,संतोष पाटील, देवेंद्र देव, सौरभ भिसे यांच्यासह सरपंच अजितराव पोळ, संजय पोळ यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा उद्‌घाटन सोहळा पार पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने सुरुवात होणार असून दिनांक 28 रोजी उरमोडी पंचक्रोशी नाट्यसंस्था यांच्यातर्फे नाट्य प्रयोग – अर्ध्या वरती डाव मोडीला, दिनांक 29 -एकता कला मंच मलवडी, नाट्य प्रयोग – सत्ते साठी काय पण, दिनांक 30 कीर्तन सेवा, दिनांक 31-बालगंधर्व सांस्कृतिक कलामंच पलूस, नाट्य

प्रयोग – आम्ही नाटकवाले,
दिनांक 1 सप्टेंबर, ज्योतिर्लिंग यात्रा, दिनांक 2-श्रीकृष्ण जयंती सोहळा, दिनांक 3- काल्याचे कीर्तन व महाप्रसाद, दिनांक 4 – सन्मित्र सांस्कृतिक निर्मित स्टार यार कलाकार, नाट्य प्रयोग – वरात घुसली घरात, दिनांक 5- शिवाज्ञा कलामंच सातारा, नाट्य प्रयोग – लुगड्याला राम राम, दिनांक 6-जागृती कला मंच सातारा, नाट्य प्रयोग – फ्रेंड्‌स फॉरिव्हर, दिनांक 7- गोंदवलेकर ऍकॅडमी गोंदवले खुर्द, नाट्य प्रयोग – अग्निपथ, दिनांक 8- मधुमीता सातारा, नाट्य प्रयोग – नाथ हा माझा,

दिनांक 9- शाहूकला ऍकॅडमी सातारा, नाट्य प्रयोग – राहिले दूर घर माझे, दिनांक 10- जय हनुमान नाट्य मंडळ कराड, नाट्य प्रयोग – कथा रंगली बंधू प्रेमाची, दिनांक 11- स्पंदन कला मंच म्हसवड, नाट्य प्रयोग – केस नं., दिनांक 12 – जाई वल्लरी प्रोडक्‍शन ठाणे , नाट्य प्रयोग – रासलीला, दिनांक 13- अश्वमेध सातारा, नाट्य प्रयोग – अपूर्ण वर्तुळ, दिनांक 14- संवाद सेवा सातारा, नाट्य प्रयोग – काटकसर, दिनांक 15- आझाद हिंद सेवा प्रतिष्ठान सातारा, नाट्य प्रयोग – फायनल ड्रॅफ्ट.

दिनांक 17 – नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा रात्री आठ वाजता प्रसिध्द चित्रपट अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे. तरी याचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी कलश पूजन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)