गोंदवले मंदिर शिखरावरील शिडीत बदल

गोंदवले ः याच शिखरावरुन देहूगावमधील इसमाने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

सुरक्षेच्या अन्य काही योजना आखल्या जाणार मंदिर ट्रस्टींचे आश्‍वासन
गोंदवले, दि. 26 (प्रतिनिधी) – गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज मंदिराच्या शिखरावर कोणालाही सहजासहजी चढता येऊ नये यासाठी शिखरावरील सध्याच्या शिडीत फेरबदल करणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अन्य काही योजना ही आखल्या जाणार असल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.
शनिवारी गोंदवले बुद्रुक, ता. माण येथ पुण्यातील देहूगावमध्ये सध्या वास्तव्यास असणारा राजू कदम नावाचा इसम दोन दिवस आपली पाचशे रुपयांची नोट उडून गेल्याचे नाटक करून मंदिराच्या पत्र्यावर चढला व तिथून वर पन्नास फूट उंच कळस असून त्यावरील शिडीच्या आधारे तो वर गेला. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली घेण्यात येत असताना त्याने अंगावर ब्लेडने वार करून घेतले. मात्र गोंदवलेमधील धाडसी युवकांमुळे त्याला जखमी अवस्थेत उतरवण्यात आले व नाट्यवर पडदा पडला. त्याने स्वतःवर ब्लेडने वार करून घेण्याने समाधीच्या कळसावर रक्त पडले होते हे धुऊन काढणे गरजेचे असल्याने अग्नीशमन दलाच्या पाण्याच्या फवाऱ्याने सगळा कळस धुवून काढण्यात आला.
यावेळी ट्रस्टी म्हणाले, आमच्या मंदिरात या आधी असली घटना कधीही घडली नव्हती. मंदिराच्या पत्र्यावर सुध्दा सहजा सहजी जाता येत नाही. मात्र हा कदम नावाचा इसम सभा मंडपा वरून सगळ्यांची नजर चुकवून वर गेला व कळसावर पोहचला. यापुढे आम्ही अधिक दक्ष राहणार आहे. मंदिराच्या कळसावर कोणालाही जात येऊ नये यासाठी शिडी दहा फूट कमी केली जाणार आहे.ज्या वेळी शिखरावर काही कामानिमित्त जायचे असेल त्यावेळी ती दहा फुटांची शिडी लावून वर जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे . काम झाल्यानंतर ती शिडी काढून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्र्याच्या बरोबर अतिशय चांगल्या प्रतीची नायलॉन जाळी लावून बंदोबस्त करून घेण्यात येणार आहे. यामुळे या पत्र्यावर पण जाता येऊ नये यासाठी अशी व्यवस्था करण्यात येईल व सुमारे चाळीस फूट उंच फोल्डींग होणारी शिडी आम्ही तयार करून घेणार आहे. या शिडीचा आपत्कालीन वेळी वापर करता यावा असा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)