गोंदवले खुर्दमध्ये श्रमदान करून महात्मा फुले जयंती साजरी

गोंदवले, दि. 12 (प्रतिनिधी) – गोंदवले खुर्द, ता. माण येथे दुष्काळ हटवण्यासाठी वॉटर कपचे काम जोरात सुरू असून हजारो श्रमिकांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांची 192 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
गोंदवले खुर्द येथे दुष्काळ हटवण्यासाठी मोठ्या संख्येने श्रमदानाचे काम सुरू आहे. गोंदवले खुर्द – राणंद रस्त्यावर जलसंधारणासाठी तब्बल 1600 जण एकत्र आले. दरम्यान, श्रमदान स्थळीच सर्वांनी महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. श्रमदानाचे काम झाल्यावर सगळे एकत्र आले. कामाच्या ठिकाणी महात्मा फुले यांची प्रतिमा मांडण्यात आली. यानंतर पाणी फाउंडेशनच्या तत्त्वानुसार अनावश्‍यक खर्च न करता हाताने टाळ्या वाजवून अभिवादन करण्यात आले. काहीजणांनी म. फुलेंच्या जीवनात आलेल्या प्रसंगाबाबत माहिती सर्वांना सांगितली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.