गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर घुसखोरी नाही

नवी दिल्ली – गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर घुसखोरीचा प्रकार झालेला नाही अशी माहिती सरकारतर्फे गृहमंत्रालयाने आज राज्यसभेत दिली. तथापि, याच काळात पाकिस्तानी सीमेकडून मात्र घुसखोरीचे 47 प्रकार झाले अशी माहितीही सरकारने दिली आहे. 

गेल्या तीन वर्षात जम्मू काश्‍मीरच्या सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे एकूण 594 प्रकार झाले त्यापैकी 312 प्रकार हाणून पाडण्यात आले असे सरकारने म्हटले आहे.

गृहराज्यमंत्री नित्यानंदर राय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. चीन सीमेतून सहा महिन्यांत कोणताही घुसखोरीचा प्रयत्न झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना सरकारकडून सांगण्यात आले की गेल्या तीन वर्षात सुरक्षा दलांकडून जम्मू काश्‍मिरात 582 अतिरेकी मारले गेले तर 46 अतिरेक्‍यांना जिवंत पकडण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.