गॅस भरताना अचानक गाडीने घेतला पेट

इंदापूर तालुक्यातील  कळंब गावामध्ये एका ओमनी या खाजगी वाहनांमध्ये गॅस भरताना अचानक गाडीने पेट घेतला. पिराळे ( ता. माळशिरस ) येथील ओमनी ही चारचाकी गाडी असून या गाडीमध्ये
विक्रीसाठी आणलेल्या ५० हजार रुपये किंमतीच्या चपला आगीत जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या प्रकारामध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे अपघाताची संख्या वाढली असून जीवितहानी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)