गूगलवर नाराज ट्रम्प यांनी दिले कारवाईचे संकेत

वॉशिंग्टन (अमेरिका) – गूगलवर नाराज अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी गूगलवर कारवाईचे संकेत दिले आहेत. आपल्या निवेदनांनी आणि ट्‌विटसमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारे ट्रम्प यावेळी काहीशा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गूगलने सोशल मीडियावर आपली वाईट प्रतिमा निर्माण केल्याचा त्यांचा गूगलवर आरोप आहे आणि त्यासाठी ते गूगलवर कारवाई करण्याच्या विचारात आहेत असे समजते.

आपण अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून मीडिया आपल्या विरोधात बातम्या पसरवत असते आणि गूगलही आपल्या विरोधातील बातम्या पसरवण्यात मोठी भूमिका निभावते असा त्यांचा दावा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकन वेबसाईट यूएसए टुडेच्या म्हणण्या नुसार गूगलवर “इडियट’ हा शब्द सर्च केला, की सर्वप्रथम डोनॉल्ड ट्रम्प यांची प्रतिमा समोर येते. या गोष्टीवरून यापूर्वीही बरचे वादऴ उठले होते. गूगलवर ट्रम्प सर्च केले, तर केवळ माझ्या विरोधातील गोष्टीच गूगल दाखवते, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. याला ते “फेक न्यूज’ म्हणतात. माझ्या आणि अन्य काहींच्या बाबतीत कंपनी हेराफेरी करते आणि नकारात्मक बातम्या पसरवते. यात नकली सीएनएन आघाडीवर आहे. रिपब्लिकन/कॉन्झरव्हेटिव्ह आणि निष्पक्ष मीडिया नष्ट झालेल्या आहेत.

ट्रम्प बातम्यांच्या सर्च रिझल्टमध्ये 96 टक्के बातम्या या राष्ट्रीय वामपंथींयाच्या बाजूने असतात. ही मोठे धोकादायक बाब आहे. गूगल आणि अन्य कंपन्या कॉंझर्व्हेटिव्हचा आवाज दाबून टाकून माहिती आणि बातम्या लपवून ठेवत आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)