गुळाणीकरांचा पाणीप्रश्‍न मिटला

पाझर तलाव भरला : ग्रामस्थांकडून जलपूजन

राजगुरूनगर- गुळाणी (ता. खेड) येथील पाझर तलाव भरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटल्याने ग्रास्थांनी पाझर तलावातील पाण्याचे सोमवारी (दि. 29) पूजन केले

दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये कोरडाठाक पडणारा गुळाणी येथील पाझर तलाव सोमवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी पूजन गावातील ज्येष्ठ महिला सरपंच इंदुबाई ढेरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सर्जेराव पिंगळे, ज्ञानेश्‍वर ढेरंगे, अमोल तांबे, अनिता शिनगारे, माऊली पिंगळे, यशवंत पिंगळे, भाकाजी ढेरंगे, नथू ढेरंगे, सुरेश पिंगळे, अर्जुन पिंगळे, चेतन पिंगळे, केतन तांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरवर्षी हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरतो मात्र, उन्हाळ्यात या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमणात शेतीसाठी पाण्याचा उपसा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात हा तलाव कोरडा पडतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्‍न संपूर्ण गावाला सतावत असतो. यावर्षी हा बंधारा भरल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर भरलेला तलावातील पाणी बचत करण्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. येथील पाण्याचा वापर नोव्हेंबरनंतर केवळ पिण्यासाठी केला जाणार आहे.

  • दरवर्षी पाझर तलाव भरतो मात्र उन्हाळ्यात तलाव कोरडा होतो पाणी टंचाई निर्माण होते. या वर्षी गावातील सर्वानुमते या पाझर तलावातील पाण्याची बचत करण्याचे ठरवेल आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी कसे राहील यासाठी आतापासूनच उपाययोजना केल्या जाणार आहेत.
    – सर्जेराव पिंगळे, उपसरपंच, गुळाणी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.