गुरूपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आळंदी- येथे सर्व जगाचा गुरू संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी समस्त जगताच्या कल्याणासाठी ईश्वराकडे पसायदान मागितले, असा संदेश दिला प्रकाश काळे यांनी गुरूंची ओळख करून देताना विद्यार्थ्यांना दिला.
आळंदी (ता. खेड) येथे श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर, तसेच महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी संस्थेचे विश्‍वस्त प्रकाश काळे बोलत होते. यावेळी जैन साध्वी परम पूज्य विसुद्धाजी (म. सा.), वडगाव शेरीचे आमदार जगदिश मुळीक, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त गवांदे गुरुजी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजीत वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त प्रकाश, आळंदी नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती व प्रशालेच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्रीधर कुऱ्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य गोविंद यादव, उपप्राचार्या छाया गायकवाड, पर्यवेक्षक सिद्धनाथ चव्हाण, सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष्या गोदावरी बकाल, सहसचिव कविता तापकीर, प्रा.सुभाष नाईकरे उपस्थित होते. यावेळी योगेश मठपती यांनी सुत्र संचालन केले आणि आभार प्रदीप काळे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)