गुरु पौर्णिमेला वरुण धवनने धरले करण जोहरचे पाय

प्रत्येक सणाला बॉलिवूड स्टार आपल्या चाहत्यांना ट्‌विटर, इन्स्टाग्रामवरून शुभेच्छा देतच असतात.आता गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही स्टारनी दिल्या आहेत. कोणी मेसेज पोस्ट केला, तर कोणी आपल्याला गुरुस्थानी असलेल्या व्यक्‍तीबरोबरचे फोटो शेअर केले.

मात्र वरुण धवनने या सगळ्यांच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो करण जोहरच्या पाया पडताना दिसतो आहे. जीन्स, टी शर्ट आणि स्पोर्ट शूज घातलेला वरुण धवन करण जोहरच्या पाया पडताना दिसते आहे. तर सूटबूटातला करण जोहर वरुणला आशीर्वाद देताना दिसतो आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वरुण धवनने “हॅपी गुरुपौर्णिमा’ असेही लिहीले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरुण धवन करण जोहरला गुरुस्थानी मानतो यामध्ये आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. “नेपोटिझम रॉक्‍स’ असे म्हणत वरुण आणि करण या दोघांनी कंगणाला स्टेजवरुन चिडवले होते. त्याच्यावरूनच वरुणसाठी करण जोहर हा गॉडफादर असल्याचे लक्षात येते. वरुण धवनचा यापूर्वीचा सिनेमा “ऑक्‍टोबर’ फारसा चालला नव्हता. मात्र आता अनुष्का शर्माबरोबरच्या “सुई धागा’कडून त्याला अधिक अपेक्षा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)