गुरुविण नाही नर-नारायण !! (गुरुपौर्णिमा विशेष)

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवमहेश्वर
गुरु: साक्षात्‌ परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नम्‌ः।।
प्रथमत: साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर याचे रूप असलेल्या गुरूंना शतशः नमन….

गुरु या शब्दाची व्याख्या कशी करावी खरे तर कळत नाही. पण गुरुपौर्णिमेनिमित्त त्याच्या प्रति असलेली श्रद्धा आणि न फिटणारे ऋण थोड्या प्रमाणात का होईना व्यक्त करता येईल म्हणून हा लेख प्रपंच असो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. त्याचे कारण असे की, व्यास ऋषी यांनी महाभारता सारखा महान ग्रंथ लिहून आपल्यासारख्या प्राणिमात्रांवर खूप मोठे उपकारच केले आहेत. इतके सखोल ज्ञान देणारे गुरु म्हणून त्यांना पहिला मान दिला जातो आणि तेंव्हा पासून गुरुपौर्णिमा आजपर्यंत साजरी करून त्याच्याबद्दल असलेले कृतद्यचे भाव व्यक्त केले जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पौराणिक सणांना आपण आजही तितकेच महत्व देतो. कारण कुठल्याही सणामागे खास काही कारणे असतात. त्यातून येणारी पिढी नवनवीन काही तरी शिकत असते. त्याचच उपयोग समाजाला होत असतो. अध्यात्मिक गुरु आपल्याला एका सुप्त अश्‍या आपल्याच अंतर्भागात असलेल्याला शक्तीची जाणीव करून देतात आणि भौतिक गुरु सांसारिक व्यवहार कसा करावा याचे ज्ञान देतात. आपल्याला भल्या-बुऱ्याचे ज्ञान देणारी पाहिली गुरु आई असते. त्यानंतर वडील आणि मग प्रत्येक ती व्यक्ती जी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी शिकवत असते.

पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे तेंव्हा लहान वयातच मुलांना शिक्षणासाठी गुरु घरी पाठवले जायचे कठीणातील कठीण शिक्षण घेऊन विद्यार्थी परतायचे ते ज्ञानाची शिदोरी घेऊनच याची आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. गुरुंना पिता तर गुरुमाउलीला मातेच्या रूपात पाहिले जात त्यांचा आदर केला जात.

त्यानंतर जसे जसे दिवस गेले तसे तसे हे रूप पालटले शिक्षण पद्धत बदलली गुरुदेव ऐवजी गुरुजी आणि नंतर सर हा शब्द रूढ झाला. पण आदर कायम तोच राहिला मग गुरु श्रीमंत आहे की गरीब याकडे न पाहता त्याच्या ज्ञानाकडे आदराने पाहिले जाते. काही ठिकाणी तर त्यांचा सल्ला घेऊनच कामे करत. विश्वाचे गुरु दत्तगुरु यांनी चोवीस गुरु केले अशी आख्यायिका आहे. तसेच ज्ञानेश्वरांच्या काळात चांगदेव नावाचे मोठे योगी होते. त्यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान मुक्ताबाईला गुरु केले.

थोडक्‍यात तुम्ही कितीही महान असला तरी गुरूशिवाय तुमच्या ज्ञानाला तेज नाही. गुरु लहान मोठा त्याच्या वयावरून न ठरता त्याच्या ज्ञानावर ठरत असतो. आजकाल बाबा नावाचे प्रस्थ धुमाकूळ घालते आहे आणि त्याला खत पाणी घालणारे ही आपल्यासारखे उच्चशिक्षित म्हणवणारेच असतात याची फार खंत वाटते. तेंव्हा वेळीच सावध व्हावें अश्‍या भोंदूबाबा पासून. ते गुरूच्या नावाला कलंक लावत आहेत आणि एकामुळे सगळ्यांनाच वेठीस धरणाऱ्या समाजाची आपल्याकडे काही कमी नाही. गुरु तोच ज्याचे बोलणे आणि वागणे सारखेच असेल. ‘छडी लगे छम छम, विद्या येई घम घम’ हे खोटे नाही. पैशाच्या प्रसिद्धीच्या लोभाने ज्ञान देणारा गुरु असत नाही. आणि गुरुनिंदा करणारा शिष्य होऊ शकत नाही.

ज्ञानदान देणारा आणि घेणारा ही तितकाच प्रामाणिक असावा लागतो. पुराण काळापासून जी गुरुपूजा होते आहे त्यांच्या प्रति जो आदर दाखवला जात आहे त्याला संस्कार म्हणतात. उपकाराची जाण म्हणतात. आणि हे फक्त गुरूमुळे साध्य झाले म्हणूनच अश्‍या या गुरूला परमेश्वरा पेक्षा ही थोडे उच्च स्थान दिलेले आहे. आणि म्हणूनच संत म्हणतात.

!!गुरु कारण गुरु तारण गुरुविण नाही नर-नारायण…!!

– मनीषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)