गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षिका असणाऱ्या दीप्ती डोळे यांनी विद्यार्थ्यांप्रती व्यक्त केलेले मनोगत…

प्रिय विद्यार्थ्यांनो,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुपौर्णिमा, शिक्षक-दिन अशा दोन्ही दिवशी तुम्ही तुमच्या प्रेमळ शुभेच्छांच्या वर्षावात आम्हाला भिजवून टाकता. काही भेटवस्तू देता, आठवणीने फोन करता, नमस्कार करता, आठवणीमध्ये रमता व रमवता.
तुम्ही जेव्हा असे प्रेमाने, आठवणीने नमस्कार करता ना, तेव्हा धन्य धन्य वाटते. जगातली सगळी संपत्ती एकीकडे आणि तुमचं आमच्यावरचं प्रेम एकीकडे असे वाटतं….. “सर्वात श्रीमंत कोण?’ अशा प्रश्‍नाचं उत्तर आहे- आम्ही शिक्षक.
प्रत्येक दिवशी खरं तर तुम्ही आम्हाला शिकवत असता, तुम्ही सदा चैतन्याने भारलेले असता. तुम्हाला सदा नवं काही तरी करायची इच्छा असते. तुम्ही उर्जाकेंद्रे असता.

किती तरी प्रकारच्या सामाजिक रचनेतून आपण वर्गात एकत्र आलेलो असतो. तुम्हालाही अनेक अडचणींतून मार्ग काढत शाळेत यावे लागते. अभ्यास, इतर उपक्रम करूनही तुम्ही सदा उत्साही असता. खेळायला, बागडायला तयार…. तुम्ही किती अनुभव आम्हाला सांगता आणि आम्हाला अनुभवसंपन्न करता….
उद्या तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांत जाल. कुणी छोटा व्यावसायिक तर कुणी अगदी देशाचा पंतप्रधानही. तुम्ही शाळेचं, आई-वडिलांच आणि आमचंही नाव मोठं कराल…..

आपल्या शाळेचे संस्कार तुम्ही कधीही विसरणार नाही, ही मला खात्री आहे. शाळेतल्या आमच्यामुळे तुम्हाला मिळालेल्या फक्त गोड आठवणी जपून ठेवा. कटू आठवणींसाठी आम्हाला माफ करून टाका. आई कशी प्रसंगी मुलाला फटकारते, पण त्यामागे तिचे निरपेक्ष प्रेम असते…. तसेच, अगदी तसेच आमचेही….
तुम्ही घडावं, घडवावं हीच तर आमची इच्छा असते. खूप खूप मोठे व्हा….. आकाशाला गवसणी घाला…. आमचे प्रेम आणि शुभेच्छा सदैव आहेतच बाळांनो तुमच्यासोबत.
शुभेच्छा!

– सौ. दिप्ती डोळे  
शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल ,रमणबाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)