गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

मातृदेवो भव! पितृदेवो भव!! गुरुदेवो भव!!!

पराशरपुत्र, थोर ग्रंथकार महर्षि वशिष्टांचे प्रपौत्र (पणतू) सर्वश्रेष्ठ पावन सद्‌गुरू वेढण्यास यांना भावपूर्ण वंदन करण्यासाठी आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा करण्याची प्रथा आहे, यास “गुरुपौर्णिमा’ किंवा “व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्‍वराः।
गुरु साक्षात परब्रह्मः तस्मैश्री गुरुवे नमः।।

हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे. मानवी जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे. म्हणूनच त्या आईच्या शब्दांनी मूल बोलायला शिकते. आई म्हणजे श्रद्धा आणि तृप्तीचे माहेरघरच. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेपासून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला योग्य जीवन पथावर न अडखळता चालायला शिकविले. ते सर्व गुरुच! अशा गुरुंची छाया ज्या भाग्यवंतांना आयुष्यभर मिळते, ते खरोखरच भाग्यवंत! पतंग आणि धागा, सुई आणि दोरा यांचा संबंध अतूट आहे. त्याचप्रमाणे गुरू-शिष्यांचं नातं आहे. म्हणूनच शिक्षकी पेशा एखाद्याला मिळालेले पुण्य आहे. या पेशाचा उपयोग करून शिक्षकाने जर आदर्श विद्यार्थी घडविले तर स्वर्गातले द्वार आपोआपच खुले होईल. विद्यार्थी वायफळ जाऊ नये, ही त्यांची कळकळीची आर्तता असते. हीच खऱ्या अर्थाने “खग्रास चंद्रग्रहणा’ने आलेली पूर्ण अशी “गुरुपौर्णिमा’ होय.

मानवजातीच्या फायद्यासाठी गुरू व्यासांनी ज्ञानाचा आणि धर्माचा आधार घेऊन परमेश्‍वरी इच्छेचा पाठिंबा मिळालेल्या विश्‍वनिर्मितीच्या शक्तीने युक्त असलेल्या शाश्‍वत अशा “वेदांची’ (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद) रचना केली. त्याचप्रमाणे धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते. अशा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! “महाभारत’ व “भगवद्‌गीता’ यांची रचना केली. महर्षी व्यासांनी अज्ञानाचा अंधःकार, भेदबुद्धीचा भ्याडपणा माणसाच्या मनातून घालण्यासाठी “महाभारत’ महाकाव्य रचले. यासाठीच त्यांना “लोकगुरू’ असे म्हणतात.

अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखविणारा गुरू. हा पूर्ण चंद्राचा दिवस असतो. या दिवशी चंद्र पूर्णपणे कोणत्याही बाधेशिवाय प्रकाशतो. तो तेजस्वी, शीतल व पूर्ण असतो. चंद्राचा ज्याप्रमाणे तेजस्वीपणा असतो. त्याप्रमाणे शांतीरुपी गुरुगृपा लाभावी, हाच “गुरुपौर्णिमा’ साजरी करण्याचा मानस आहे.

– सौ. कणसे डी. व्ही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)