गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी

पिंपळे गुरव – गुरुपौर्णिमेनिमित्त सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरातील विविध देवतांच्या मंदिरांमध्ये तसेच शाळांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये होमहवन, भजन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. ज्ञान देणाऱ्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्‍त करावयाची हा दिवस असल्याने प्रत्येक शिष्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच गुरुपौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व देखील आहे. यामुळे गुरु दत्तात्रेय, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांच्या मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याची तयारी ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

कासारवाडी आकर्षक रोषणाई
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून फुलांची सजावट व मंडप उभारणी करण्यात आली आहे. कासारवाडी येथील श्री दत्त सेवा कुंज आश्रमामध्ये आकर्षक रोषणाई व रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली असुन येथे पहाटे “श्री’ महाअभिषेक घालण्यात येणार आहे. तसेच सकाळी हभप सुप्रिया साठे यांचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन,हरिपाठाचे आयोजित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी सांगवीत साई गीतांचा कार्यक्रम
नवी सांगवी येथील साई चौकातील साई मंदीर येथे ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्रपरिवारातर्फे भाविकांसाठी मंडप उभारणी करून दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पहाटे श्री साईंची काकड आरती ,सकाळी होमहवन होईल.दुपारी महाप्रसादाचे वाटप तसेच सायंकाळी महाआरती व साई गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जुनी सांगवीत अखंड पारायण
सांगवी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात सेवा न्यासातर्फे पहाटे अभिषेक,होमहवन ,डॉ. गजानन खासनीस प्रस्तुत श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीतर्फे 2 ऑगस्टला नृसिंह शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपळे गुरव येथील गुरुदत्त नगर येथे श्री गुरुदत्त सेवा प्रतिष्ठानतर्फे गुरु दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून या ठिकाणी सायंकाळी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेवक शंकर जगताप, स्वीकृत सदस्य महेश जगताप आदींच्या हस्ते महाआरती होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)