गुरुपौणिमेनिमित्त साई देवेस्थानला भक्तांची मांदियाळी

अण्णापूर- शिरुर ग्रामीण (ता.शिरुर) येथील रामलिंग रोडवरील शिक्षक कॉलनीतील साई देवस्थान येथेही गुरुपौणिमेचा सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. रामलिंग रोड येथील शिक्षक कालनीतील सर्व रहिवासी शिक्षकांनी एकत्र येत 30 लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च करुन साईंचे अत्यंत देखणे मंदिर उभारले आहे. दर गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता साईंची भव्य आरती होत असते.
या देवस्थानच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी साईंना देवस्थानचे अध्यक्ष शहाजी पवार यांचे हस्ते महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी हभप अरुण महाराज उंबरेकर यांचे गुरुचरित्रावर प्रवचन झाले. यंदा या आरतीचा मान शिरुर ग्रामीणचे युवा सरपंच विठ्ठल घावटे यांना सहकुटुंब मिळाला होता. त्यांच्या हस्ते संध्याकाळी साईंची आरती करण्यात आली.
यासाठी साई देवस्थानचे अध्यक्ष शहाजी पवार, कार्याध्यक्ष राजेंद्र चोरे, सचिव नवनाथ मैड, खजिनदार शंकर रासकर ज्येष्ठ विश्वस्त बबनराव डांगे, केंद्रप्रमुख लक्ष्मण काळे, रावसाहेब पवार, युवा कार्यकर्ते संदीप गावडे, रामदास कौठाळे, काकडे साहेब, प्रदीप थोरात, सुरेश जासुद, सागर चोरे, अनिल लढ्ढा, धामणेर, ज्ञानेश पवार, प्रशांत गव्हाणे, सुधाकर मिडगुले यांनी योगदान दिले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरपंच विठ्ठल घावटे यांच्यावतीने करण्यात आली होती. यावेळी गुरुदत्त स्पिकरचे मालक काळुराम दसगुडे यांनी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. याबरोबर वर्षभर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतानाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्तविक शहाजी पवार यांनी, सुत्रसंचालन ज्ञानेश पवार यांनी केले. तर आभार प्रदीप थोरात यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)