गुरुजी परत द्या, न्हायतर शाळेला टाळे ठोकू

संग्रहित फोटो

चिंबळी- “आमचे गुरुजी आम्हाला द्या’, न्हायतर शाळेला टाळे लावावे लागेल असा इशारा केळगाव (ता. खेड) ग्रामस्थांनी दिली आहे.
केळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विनोद चव्हाण यांची ऑनलाईन बदली झाली आहे. या कार्यक्षम शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. दरम्यान, शाळेत नव्याने शिक्षक रुजू झाले आहेत मात्र, वर्गांच्या संख्ये नुसार शिक्षक कमी असल्याने याचा परिणाम शाळेवर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच खासगी इंग्रजी माध्यमांच्या महागड्या शाळांचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्‍या बाहेरचा आहे. त्यातच जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे. तसेच आमच्या गावाती शाळेचा विनोद चव्हाण या शिक्षकाने कायापालट केला आहे. दुसरीतील विद्यार्थी 25 चा पाढा म्हणत आहे. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना लाजवतील असे इंग्लीश बोलतात अन्‌ तसेच लिहितातही. विद्यार्थ्यांना देखील या शिक्षकांचा लळा लागला आहे. दरम्यान, या शाळेची 2006मध्ये पटसंख्या अवघी 90 ते 100 च्या घरात होती. मात्र, विनोद चव्हाण रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक घरोघरी फिरून पालकांशी संपर्क करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व गावातील व परिसरातील सर्व मुले शाळेते दाखल करून घेतले, तसेच शाळेत विविध संस्थांचे कार्य सुरू केले. नांदी फाऊंडेशनमार्फत मुलींना शालेय मोफत साहित्य व जादा शिकवणीचे वर्ग सुरू केले. तसेच शाळेत संगणक, इ-लर्निंग, डिजिटल, शाळा करण्यासाठी चव्हाण यांचे मोलाचे कार्य आहे. या त्यांच्या धडपडीमुळे शाळेची पटसंख्या 154 वर गेली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणांचा लळा लागला आहे, त्यातच त्यांची बदली झाल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने चव्हाण यांची बदली रद्द व्हावी यासाठी आम्ही आंदोलनाचे हत्यार उचण्यासही तयार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

  • मुख्याध्यापक पद रिक्‍तच
    जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदली प्रक्रियेत केळगाव शाळेतील पाच शिक्षकांची बदली तर सहा नव्याने रुजू झाले आहेत. त्यातच मुख्याध्यापक निवृत्त झाले असून त्यांची जागा अद्यापही रिक्‍तच आहे. दरम्यान, या शाळेत सात वर्ग या सात वर्गांत सहाच शिक्षक शिकवित असल्याने त्यांची वर्ग सांभळता सांभाळता दमछक होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार असल्याने आमचे जुने गुरुजी विनोद चव्हाण यांची बदली रद्द करून त्यांना केळगाव शाळेत पुन्हा आणा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)