गुन्ह्यात सरकारी पंचही पोलिसांना घेता येईल

सीआयडीचे प्रमुख संजीव सिंघल यांची सूचना

पुणे -दारू आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी दागिन्यांची ओळख परेड घेतली तरी गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते. तसेच या गुन्ह्यात सरकारी पंचही पोलिसांना घेता येईल, अशी सूचना सीआयडीचे प्रमुख व अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांनी केली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील मे ते डिसेंबर 2017 या कालावधीतील प्रकरणाचा उत्कृष्ट अपराधसिद्धी बक्षीस देऊन 47 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते

संजीव सिंघल म्हणाले, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याकरीता उत्कृष्ट कर्तव्य पार पाडणाऱ्यांना गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न, उत्कृष्ट अपराधसिद्धी आणि सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या बक्षीसासाठी प्रत्येक महिन्याला निवड करण्यात येते. 2013 पासून गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 32 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. भारतातील सर्व राज्यांतील शिक्षांचे प्रमाण पहात ते अजूनही कमी आहे. राज्यात एकूण पावणेदोन लाख गुन्ह्यांपैकी 60 हजार गुन्हे हे मुंबई पोलीस अॅक्‍टचे असतात. त्यात 25 टक्के दारुशी संबंधित असून त्यानंतर जुगार व अमली पदार्थांचे गन्हे आहेत.

तसेच सव्वा दोन लाख गुन्ह्यांपैकी 40 टक्‍के गुन्हे दुखापतीचे असतात. या गुन्ह्यात हत्यार हस्तगत करणे अत्यावश्‍यक आहे. याप्रकारच्या गुन्ह्यात पुढे फिर्यादी उलटतात. चोरीमध्ये गेलेले दागिने हेच असल्याचे सिद्ध करावे लागते. यावेळी पोलिस जशी आरोपींची ओळख परेड घेतात, तशी दागिन्यांची ओळख परेड घेतली तर शिक्षा होण्याच्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक, डॉ. जय जाधव, पालीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)