गुन्ह्यांची कल्पना असती तर चोकसीला नागरीकत्व दिले नसते 

अँटिगुआच्या विदेश मंत्र्यांची माहिती 
नवी दिल्ली: भारतातील बॅंकांचे अब्जावधी रूपये बुडवून विदेशात फरारी झालेल्या मेहुल चोकसी याच्या गुन्ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. ती जर आम्हाला वेळेत मिळाली असती तर आम्ही त्याला आमच्या देशाचे नागरीकत्व दिले नसते असे प्रतिपादन अँटिगुआचे विदेश मंत्री चेट ग्रीनी यांनी आज एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अँटिगुआ सरकारने सिटीझनशिप इनव्हेसमेंट मार्केट योजने अंतर्गत ठराविक पेैसे भरल्यानंतर कोणत्याही नागरीकाला आपल्या देशाचे नागरीकत्व बहाल करण्याची योजना आखली आहे. त्याचा लाभ घेऊन चोकसी हा त्या देशाचा नागरीक झाला आहे. त्याने 1 कोटी 30 लाख रूपयांची रक्कम मोजून या देशाचे नागरीकत्व घेतले आहे. या संबंधात भारत सरकारला आम्ही पुर्ण सहकार्य करू असेही त्यांनी म्हटले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)