गुन्हेगारी संपविण्यासाठी आहेत पोलीस

तळेगाव ढमढेरे- टाकळी भीमा येथे ग्रामसुरक्षा दल स्थापन कार्यक्रमात बोलत असताना आपल्याला गुन्हेगाराला नष्ट करण्यासाठी पोलीस नाही तर त्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपवायची, असल्याचे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले.
शिक्रापूर हद्दीतील 33 गावामध्ये सर्वात प्रथम टाकळी भीमा गावचा पहिला क्रमांक ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी लागला आहे. या गावातील तरुणांच्या उत्साहाचे कौतुक पोलीस निरीक्षक सदशिव शेलार यांनी केले.
शेलार म्हणाले, टाकळी भीमा गावातील कायदा सुव्यवस्था काळजी नाही कारण राममंदिर आणि मस्जिद शेजारीशेजारी आहे. हे सामाजिक ऐक्‍याचे उदाहरण असलेले गाव आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी गस्तीच्या वेळी आपल्याला संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलीस पाटलांशी संपर्क करून माहिती द्यायची आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार नाही. गुन्हेगाराला नष्ट करण्यासाठी पोलीस नाही गुन्हेगारातील प्रवृत्ती संपवण्यासाठी पोलीस आहेत. म्हणून कारागृह, न्यायालय आहे. काही कालांतराने त्याची वैचारिकता बदलून तो चांगला नागरिक व्यावसायिक बनलेला असतो,.तसेच प्रकाश कर्पे पोलीस पाटील झाल्यापासून सहा महिन्यात गावातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते आकाश वडघुले यांनी केले. तर प्रास्ताविकामध्ये पोलीस पाटील प्रकाश करपे यांनी गावाचा गुन्हेगारीसंदर्भात आढावा सांगितला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने, सरपंच रवींद्र दोरगे, उपसरपंच पांडुरंग ढोरे, मोहन गायकवाड, रामभाऊ तारू, माजी सैनिक विठ्ठल वडघुले, विश्वास साकोरे, विठ्ठलवाडीचे पोलीस पाटील शरद लोखंडे, विशाल पाटोळे, अमोल वडघुले, निखिल पोखरकर, डॉ. दौलत घोलप, हनुमंत घोलप, तसेच गावातील ग्रामस्थ तरुणवर्ग उपस्थित होते. यावेळी आभार नवनाथ काळभोर यांनी मानले.

  • ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना टी शर्ट
    ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना पोलीस रेडियम असलेले टीशर्ट मिळणार आहे. तसेच टाकळी भीमा ग्रामसुरक्षा दलाचा आदर्श इतर गावामध्ये राबणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीबाबत योग्य मार्गदर्शन पोलीस निरीक्षक सदशिव शेलार यांनी केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)