गुन्हेगारी रोखण्यासाठी “पोलीस आपल्या दारी’

पिंपरी – “पोलीस आपल्या दारी योजने’द्वारे पोलीस आता थेट नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या तक्रारींची दाखल घेणार आहेत. तसेच “फोन अ फ्रेन्ड’ उपक्रमाद्वारे शहरातील गुन्ह्यावर आळा बसवणार असल्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आयुक्त म्हणाले की, शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी वर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचणे गरजेचे असते. यासाठी आपण दोन उपक्रम राबवत आहोत. ज्यामध्ये “फोन अ फ्रेंड’ या उपक्रमात घटना घडताच पोलीस शक्‍य तितक्‍या लवकर घटनास्थळी दाखल होतील. “क्‍विक ऍक्‍शन फोर्स’प्रमाणे ते काम करणार आहेत. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात पथक तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात आठ ते नऊ लोक असतील. ज्यावेळी पोलिसांना कंट्रोलद्वारे अथवा थेट पोलीस ठाण्यात फोन येईल. त्यावेळी अवघ्या अर्धा तासात पोलीस तिथे पोहचतील, हा त्यामागचा हेतू आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. पुढील आठवड्यात “सरप्राईज कॉल’ घेऊन त्याचे परिक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये अगदी चुकीचा फोन असला तरी पोलिसांनी घटनास्थळी जाणे अपेक्षीत आहे, असेही पद्मनाभन यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पोलीस आपल्या दारी’ या उपक्रमात पोलीस ठाण्याचे एक पथक परिसरातील गृहप्रकल्प, वसतीगृह, पेईंग गेस्ट, भाडेकरु यांची माहिती गोळा करणार आहे. त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. तेथेच त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील. प्रत्येक इमारतीसाठी एक स्वतंत्र तक्रार पेटी ठेवली जाणार आहे. त्यामध्ये निनावी तक्रार नागरिक करु शकतील. गरज पडल्यास सोसायटीच्या बैठकांमध्येही पोलीस सहभागी होतील. तसेच वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई थेट त्यांच्या घरी जाऊन होणार आहे. घरी जाऊन ई चलनाद्वारे त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. हे दोन्ही उपक्रम पुढील अठवड्यापासून सुरु करण्यात येणार असल्याचेही आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले.

नागरिकांना संपर्कासाठी आवाहन
नागरिकांनी आपल्या डोळ्यासमोर कोणताही अनुचित प्रकार घडत असेल अथवा त्यांच्यावर एखादा अनुचित प्रसंग उद्‌भवल्यास पोलीस नियंत्रण कक्षाच्या 020-27450888 अथवा 27450666 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)