गुणवत्ता सिद्ध करण्याचे धाडस अंगी असावे – प्रा. काळे

भाविनिमगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
भाविनिमगाव – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक आदर्श राज्यकर्त्या होत्या. थोर व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या शैक्षणिक युगात वावरताना ज्ञानप्राप्तीला महत्त्व असुन प्रत्येकाच्या अंगी गुणवत्ता सिद्ध करण्याचे धाडस असावे असे प्रतिपादन प्रा. संजय काळे यांनी केले. भाविनिमगाव (ता. शेवगाव) येथे अहिल्यादेवी व जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रा. काळे बोलत होते.
प्रारंभी अहिल्यादेवी होळकर, जिजामाता, व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संभाजी काळे होते. तर नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य कारभारी नजन, सरपंच पांडुरंग मरकड, शाम शिरसाठ, जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष संजय काळे, उपाध्यक्ष नंदकुमार शेळके, अण्णासाहेब काटे, सेवा सोसायटी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, प्रा. त्र्यंबक जाधव, ग्रामसेवक चंद्रकांत जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेत यश संपादित केलेल्या अविनाश तेलोरे, सुरज जाधव, साईनाथ विर या यशस्वी विद्यार्थ्यांचा अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले तर आभार विष्णू मुंजळे यांनी व्यक्त केले. शहरटाकळी येथेही ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अलकाबाई शिंदे. सुनील गवळी, संदीप राऊत, सुभाष बरबडे, रवींद्र मडके, संदीप गादे, सिताराम कुंडकर, अशोक निंबाळकर, विशाल गवारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)