‘गुड, बॅड टच’मुळे विनयभंगाचा प्रकार उघड

पिंपरी – शाळेमध्ये “गुड टच व बॅड टच’ हा उपक्रम सुरु असताना वर्गातील सहावीतील विद्यार्थिनीने तिच्यासोबत शिक्षकानेच केलेल्या अश्‍लिल वर्तनाची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर एका शिक्षिकेने पुढाकार घेत पोलिसांत धाव घेतल्याने हिंजवडी पोलिसांनी संबंधित शिक्षकाला अटक केली आहे.

संतोष हरिभाऊ भेगडे (वय – 42, रा. घोटावडे, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शाळेतीलच एका महिला शिक्षिकेने पुढाकार घेतल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार एक महिन्यांपूर्वी घडला आहे. इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या बारावर्षीय मुलीसोबत तिच्याच वर्ग शिक्षकाने हा घृणास्पद प्रकार केला. ती मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वर्गात बसली असताना भेगडे तेथे आला व त्याने तिच्या सोबत असलेल्या मुलीला बाहेर पाठवले व पीडिते शेजारी बसून गैरवर्तन केले. ही घटना एक महिन्यापूर्वी झाली मात्र आपल्या सोबत नेमके काय झाले हे तिला सांगता येत नव्हते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शाळेत मुलांसाठी “गुड टच व बॅड टच’ उपक्रम घेण्यात आला. यामध्ये पीडित मुलीला तिच्यासोबत झालेली घटना आठवली व तिने वर्गात तिच्या शिक्षकेला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितले. तिने आईला याची माहिती दिली होती. बदनामीचा विचार करत तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी शाळेतील शिक्षकेनेच या विषयाला वाचा फोडली.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या की, संबंधीत शिक्षकाला अटक केली असून त्याची पार्श्‍वभूमी पाहिली असता त्याने या आधीही असा प्रकार केला होता. त्यामुळे त्याची संबंधीत शाळेतून सुसगाव येथे बदली झाली होती. मात्र त्याची विकृती संपली नाही. त्याने इतर काही मुलींसोबतही गैरवर्तन केले आहे का, याबाबत चौकशी सुरु आहे. पालकांनीही मुलींनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)