गुडघेदुखी दूर करणारे ‘सेतूबंधासन / स्कंधासन’

शयनस्थितीतील हे आसन आहे करायला सोपे आहे. पाठीवर झोपावे म्हणजेच शयनस्थिती घ्यावी. पाय गुडघ्यात वाकवावेत. पायाच्या टाचा जुळवाव्यात. गुडघे जुळवावेत. सावकाश श्‍वास घेत कंबर उचलावी. त्याचवेळी हाताने पायाचे घोटे पकडावेत. मग संथ श्‍वसन करावे. या स्थितीत जेवढा वेळ रहाता येईल तेवढा वेळ रहावे. हे अतिशय सोपे आसन आहे. कंबर उचलता आली पाहिजे. त्यामुळे कंबरेला व्यायाम होतो. त्याचप्रमाणे आपण पाठही उचलतो.

सीट, कंबर, गुडघे उचलून एक विशिष्ट बाक देताना डोके मात्र जमिनीलाच टेकलेले हवे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन नियमित करावे. त्यामुळे गुडघेदुखी होत नाही. हातापायाचे स्नायू मजबूत होतात. पाठीचा कणा मजबूत होतो व योग्य प्रकारे कार्यान्वित होतो. कंबरेचे स्नायू लवचिक होतात. जर स्नायू आखडले असतील तर मोकळे होतात. खांदे मजबूत होतात. हातापायांचे रक्‍ताभिसरण सुधारते. 30 सेंकदापर्यंत हे आसन सहजपणे टिकवता येते.विशेषतः स्त्रियांनी हे आसन रोज करावे. त्यामुळे त्यांचे मासिकपाळीचे तसेच कंबर व पाठदुखीचे विकार बरे व्हायला मदत होते. सुदृढ स्त्रियांनी रोज हे आसन केले तर भविष्य काळात त्यांना कंबर व पाठदुखीचा त्रास जडत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)