गुजरात मधील भाजप आमदाराचे सदस्यत्व रद्द

अपुऱ्या अर्जामुळे सुप्रिम कोर्टाचा निर्णय

अहमदाबाद – गुजरातमधील भाजपचे द्वारका मतदार संघातील आमदार प्रभुभा माणेक यांचे विधानसभा सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवले आहे. त्यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज अपुरा व चुकीचा असल्याचे निष्प्पन्न झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. सन 2017 मध्ये गुजरातेत विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या.

निवडणुकीत माणेक हे द्वारका मतदार संघातून भाजपच्या तिकीटीवर विजयी झाले होते. त्यांच्या निवडीला कॉंग्रेस उमेदवार मेरामन अहिर यांनी आक्षेप घेतला ंहोता. भाजप उमेदवाराचा अर्जच चुकीचा आणि अपुरा होता त्यामुळे तो अर्ज बाद ठरवला पाहिजे होता असा आक्षेप अहिर यांनी घेतला होता. त्यांचा दावा न्यायालयाने वैध ठरवत भाजप उमेदवाराची निवड रद्द ठरवली. त्यांच्या जागी आपल्याला विजयी घोषित करण्यात यावे अशी मागणीही अहिर यांनी केली होती. पण त्यांची ती मागणी मात्र न्यायालयाने मान्य केली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.