गुजरात पोलिसांकडून पाच तरुणांची चौकशी

जयंती भानुशाली खूनप्रकरण : हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधांवरून कारवाई

पुणे – गुजरातमधील माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष जयंती भानुशाली यांच्या खून प्रकरणामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी पुण्यातील पाच तरुणांची चौकशी केली आहे. हे पाचही तरुण एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे सुत्रांनी सांगितले. यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या दोघांना चौकशीसाठी गुजरातला नेण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील आठवड्यात 8 जानेवारीला भानुशाली हे सयाजीनगरी रेल्वेने भुजवरून अहमदाबादला जात होते. त्यावेळी मालिका येथे त्यांच्या एसी कोच डब्यामध्ये घुसून काही जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण, आरपीएफ अशा वेगवेगळ्या पोलीस तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे. या पार्श्‍वभूमिवर ही कारवाई झाल्याचे समजते.

अमित शहा यांना दिला होता इशारा…
भानुशाली हे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचे समर्थक आहेत. रुपाला यांना गुजरातचे मुख्यमंत्री करावे, यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी आपल्याकडे आमदार असून रुपाला यांना मुख्यमंत्री करा अन्यथा आमदारांना घेऊन बाहेर पडू, असा इशाराही भानुशाली यांनी दिल्याचे बोलले जात होते. गुजरातमधील निवडणुकीत भानुशाली यांच्याऐवजी भाजपने कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या छबील पटेल यांना उमेदवारीची संधी दिली होती. मात्र, पटेल यांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पटेल व भानुशाली यांच्यामध्ये वाद झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)