गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा विजय

एबीव्हीपीला धक्का
गांधीनगर – कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच आता थेट नवे आव्हान उभे केले आहे. गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात नॅशनल स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय या कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपची अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी संघटना तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.

जनरल सेक्रेटरी (जीएस) आणि उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिंडेंट) या पदासाठी या निवडणुका झाल्या असून एकूण 16 हजार विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. मोदींच्या राज्यात, तेही त्यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघात कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने हा ऐतिहासिक विजय मिळवला. जीएसच्या महत्वाच्या पदावर एनएसयूआयच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला. तर जीएस आणि व्हीपी या दोन महत्त्वाच्या पदावर एबीव्हीपी चक्क तिसऱ्या स्थानावर फेकली गेली.
या निवडणुकीच्या निमित्ताने तरुणाईचा कल भाजपविरोधी असल्याचे दिसून येत आहे, असा दावा कॉंग्रेसने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी कॉंग्रेसच्या एनएसयूआयने दिल्ली विद्यापीठातही विजयी झेंडा फडकावला होता. कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या या विजयानंतर गुजरातचे कॉंग्रेस प्रभारी राजीव सातव यांनी अभिनंदन करणारे ट्‌विट केले आहे. उल्लेखनीय विजयाबद्दल एनएसयूआयचे अभिनंदन. हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातच्या तरुणाईचा कल भाजपविरोधी असल्याचे दिसते. गुजरात कॉंग्रेसचे अभिनंदन आणि अभिमान आहे, असे राजीव सातव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील महत्त्वाच्या पदांवर तरुण कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. प्रस्थापितांना बाजूला करत युवा आणि तरुण चेहऱ्यांना त्यांनी पदे दिली आहेत. या विजयामुळे गुजरात कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणूकीत भाजपला आव्हान ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)