गुजरातमधील जमीन अधिग्रहण केलेल्या 5 हजार शेतकऱ्यांनी मागितला इच्छामृत्यू

अहमदाबाद (गुजरात) – गुजरातमधील जमीन अधिग्रहण केलेल्या 5 हजार शेतकऱ्यांनी इच्छामृत्यू मागितला आहे. भावनगर जिल्ह्यामध्ये राज्य विद्युत कंपनीने 12 गावातील जमीन अधिग्रहित केली आहे. या जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात संघर्ष करणाऱ्या 5,000 पेक्षा अधिक लोकांनी प्राधिकाऱ्यांना पत्र पाठवून इच्छामृत्यूची परवानगी मागितली आहे. जमीन अधिग्रहणाविरोधात संघर्ष करणाऱ्या संघटनेच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे.

12 प्रभावित गावांतील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून 5259 लोकांनी इच्छामृत्यूची मागणी केली असल्याची माहिती स्थानिक शेतकरी आणि गुजरात खेदुत समाजाचे सदस्य नरेंद्र सिंग गोहिल यांनी दिली आहे. राज्य सरकार आणि जीपीसीएल (गुजरात पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड) ने आमची जमीन आमच्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतली असल्याने आम्हाला इच्छामृत्यूची परवावगी द्यावी अशी मागणी करणारी पत्रे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेली आहेत. असे त्यांनी सांगितले आहे.

जमीन अधिग्रहण केल्यानंतर 20 वर्षांनी सरकार जमिनीचा ताबा घेत आहे आणि ही बेकायदेशीर बाब आहे, ही गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)