गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ

अहमदाबाद (गुजरात): गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.   वाघेला यांनी आज २९ जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे राष्टृवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

शंकरसिंह वाघेला गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीचे कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. आरएसएसाअनिओ जनसंघातून राजकारणाला सुरुवात केलेले शंकरसिंह वाघेला दोन दशके कॉंग्रेस पक्षात होते. केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवलेल्या वाघेला यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले गेले नसल्याने त्यांनी कॉंग्रेसशी नाते तोडून जनविकल्प मोर्चाची बांधणी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/praful_patel/status/1090199082356953089

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)