गुगलसारख़्या कंपन्यांमध्ये आता नोकरीसाठी नाही पदवीचे गरज

वॉशिंग्टन (अमेरिका): गुगलसारख़्या 15 कंपन्यांमध्ये आता नोकरीसाठी शैक्षणिक पदवीची गरज लागणार नाही. अनेक वेळा सर्व गुंण असून, पात्रता असूनही केवळ पदवीचे प्रमाणपत्र नाही, म्हणून नोकरी मिळत नसल्याचा कटू अनुभव असंख़्य युवकांना येत असतो. मात्र आता नोकरीसाठी पदवीवाचून काहीही अडंणार नाही. कारण ऍपल, गूगल, पेंग्वीन रॅंडस्म हाऊस यांसारख्या 15 कंपन्यांनी केवळ पदवी पाहून नोकरी देण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे ठरवले आहे. नोकऱ्यांची माहिती देणाऱ्या ग्लासडोर च्या एका ब्लॉग साईटने ही माहिती दिली आहे.

अनेक टॅलंटेड युवक कॉलेजात वा अन्य शैक्षणिक संस्थात न जाता स्वत:च शिकत असतात. त्यांच्याकडे सर्व पात्रता असली तरी एक प्रमाणपत्र नसते, त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि एरवीही गूगलसारख्या कंपन्या ऍकेडेमिक्‍सला फार महत्त्व देत नाहीत. केवळ पुस्तकी ज्ञान असण्यापेक्षा टॅलंट. क्रीएटिव्ह असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रमाणपत्रांशिवायही त्यांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गूगल, अर्न्स्ट अँडस्‌ यंग़, पेंग्वीन रॅंडम हाऊस, कॉस्टको होलसेल्स, होल फूड्‌स, हिल्टन, पब्लिक्‍स, ऍपल, स्टारबक्‍स, आदी कंपन्यांचा पदवी न पाहता नोकरी देण्याचा निर्णय घेतलेल्या कंपंन्यांमध्ये समावेश आहे.
गूगलचे माजी उपाध्यक्ष लेस्लो बॉक यांनी 2014 मध्ये सांगितले होते, की तुम्ही शाळेत न गेलेली मुले आणि त्यांचे काम पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की, त्यांच्यात एक टॅलंट असल्याचा तुम्हाला अनुभव येईल,त्यासाठी पदवीचा अडथळा आम्ही लवकरच काढून टाकणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)