गुंगीचे औषध देऊन बलात्कार

पिंपरी- शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी दोघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन रामजी ठक्कर व लालू उर्फ हेमंत चौदामासा (दोघेही राहणार भाटनगर पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 वर्षीय पिडीतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला कोल्ड्रिंक्‍समध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनीही अत्याचार केला. हा प्रकार 2016 पासून सुरु होता. यावेळी आरोपींने महिलेचे चित्रीकरण केले व चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर अत्याचार करण्यात आले. अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.