गिरीष बापट यांचा पार्थ पवारांना टोला

पुणे-  पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीष बापट यांनी आपल्या विजया नंतर, आज पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जिह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या निवडणुकीत भाजपाला देशभरातील जनतेने मोठा विजय मिळून दिला आहे. तसेच पुण्यातील नागरिकांनी देखील मला मोठी साथ देऊन विजयापर्यंत पोहचवले आहे. असं बापट यावेळी म्हणाले. मात्र यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात आमची ताकद थोडी कमी पडली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गिरीष बापट यांनी मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ज्या उमेदवाराला किंवा व्यक्तीला राजकीय परिपक्वता नसताना, तो कोणाचा नातू किंवा मुलगा आहे. म्हणून त्याला राजकारणात स्थान द्यायचे हे योग्य ठरणार नाही. त्यासाठी त्याला स्वतःला पुढे येऊन सिद्ध करावे लागणार आहे. यावेळी गिरीष बापट यांनी आपल्या पक्षातील इतर उमेदवारांचे देखील अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.