गावठी पिस्तूल, काडतुसासह एकजण ताब्यात

लोणी काळभोर-येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरत असलेल्या एकाकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी श्रीकांत मल्लिकार्जुन मेमाणे (वय 28, रा. राहिंजवस्ती लोणीकाळभोर, ता. हवेली) यांस ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे मिळून आलेले लाकडी आवरण असलेले गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 8 एप्रिल रोजी कदमवकवस्ती गावच्या हद्दीत कवडीगावाकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेलजवळ श्रीकांत मेमाणे हा पिस्तूल बाळगून फिरत आहे.

या बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश उगले यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पवार व ननवरे पोलीस पथकासमवेत शहानिशा करण्यासाठी या ठिकाणी गेले. त्यावेळी मेमाणे हा संशयितरीत्या थांबलेला असताना मिळून आला. पकडून त्याची झडती घेतली असता त्त्याने कंबरेवर पॅन्टचे आतील बाजूस 25 हजार 200 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल त्यावर लाकडी आवरण असलेले व एक जिवंत काडतूस असे बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव आपले जवळ बाळगले असताना मिळून आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस आधिकारी सई भोरे पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश उगले यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमन शेख, सोमनाथ क्षीरसागर, परशुराम सांगळे, शिरीष कामठे, सागर कडु यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.