गावठी पिस्तुल बाळगणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे- बेकायदेशीरपणे गावठी बनवटीचे पिस्तुल आणि एक जीवंत काडतूस बाळगणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
आकाश कुमार शेटे (वय 20, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राकेश राजेंद्र क्षीरसागर यांनी खडक पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.30 जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास नेहरू रोड येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या परिसरामध्ये शेटे हा पिस्तुल आणि जीवंत काडतूस बाळगून असताना पोलिसांना मिळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेटे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने पिस्तुल आणि जीवंत काडतूस कोठून आणले?, त्याचा इतर कोणी साथीदार आहे का?, याचा वापर तो कशासाठी करणार होता? याचा शोध घेण्यासाठी त्याला कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने शेटे याला पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)