गावठी कट्ट्यासह तिघांना श्रीरामपूरमध्ये अटक

श्रीरामपूर – नेवाशातील तिघांना गावठी कट्ट्यासह श्रीरामपूर पोलिसांनी पकडले. हे संशयित आरोपी कट्टा विक्रीसाठी आले होते, का घातपात करण्यासाठी याचा तपास आता श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक बहिरट तसेच राहुरी पोलिसांसह रात्री संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईदरम्यान अशोकनगर फाटयावर विनाक्रमांकाची ऍव्हेंजर मोटारसायकल पकडली. त्यातील तिघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशयित आरोपीजवळ “मेड इन इंग्लंड’ लिहिलेले गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. जिवंत काडतुसे के.एफण 7.62 मिळून आली. सागर वसंत नेटके (रा. मराठी शाळेशेजारी, देवगाव, ता. नेवासे) शाहीद दादाभाई सय्यद (रा.देडगावरोड, सय्यदवस्ती, देवगाव, ता.नेवासे), जुनेस सत्तार शेख (रा. हनुमान मंदिराशेजारी, देवगाव, ता.नेवासे) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3, 7, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गावठी कट्टा विक्रीसाठी आले होते का? त्यांचा घातपाताचा, कुणाच्या हत्येचा डाव होता का, याचा तपास सुरू आहे.
वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरात केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडलेले आरोपी अंदाजे 10 ते 12 असून पकडलेल्या सर्व संशयित आरोपींची बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस कसून चौकशी करत आहेत. श्रीरामपूर शहर व राहुरी पोलिसांनी ही कामगिरी बजावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)