गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

पिंपरी – गावठी कट्टयासह तरुणाला सांगवी पोलिसांनी ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ अटक केली आहे. यावेळी त्याच्याजवळ एक जिवंत काडतूस देखील सापडले.

उमेश सुरेश पवार (वय-29, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममतानगर मधील बालयोगी आश्रमाजवळ एक इसम संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असल्याचे आढळले. उमेश याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), भारतीय दंड विधान कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस फौजदार भालेराव, पोलीस हवालदार ज्ञानेश्‍वर माडीवाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)