गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही

रेडा- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्‍यातील विकासकामांना शासनाचा निधी मिळत असून,यामध्ये गोतोंडी गावच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. गोतोंडी गावच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 1 कोटी 54 लाख रकमेचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार भरणे यांचा गोतोंडी गावकऱ्यांनी भरणेवाडी येथे सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच शोभना कांबळे, शंकर भोंग, यशवंत पाटील, अनिल खराडे, काशिनाथ शेटे, किशोर बिबे, कुमार शिंदे, अशोक घोडके, मारुती नलवडे, रामचंद्र काळे, वजीर शेख, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते. आमदार भरणे म्हणाले की, ज्या कामासाठी शासनाने निधी दिला आहे. त्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सरपंच शोभना कांबळे म्हणाल्या की, महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, यासाठी आमदार भरणे यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करून आमच्या गावाला कधी नव्हे एवढा रकमेचा निधी दिला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)