गावकी-भावकीचा धावपळ संपली!

  • विजयाचे दावेप्रतिदावे : मावळातील सात ग्रामपंचतचा निवडणूक निकाल जाहीर

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील ओव्हळे, दिवड, कलाट, सुदुंबरे, सुदवडी, कोंडीवडे व जांबवडे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. सरपंचपद थेट जनतेमधून असल्यामुळे गावकी-भावकीचे हेवेदावे दिसून आले. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहे.

जून ते सप्टेंबर महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार रविवारी मावळ तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतीची मतदान शांततेत झाले. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 28) वडगाव मावळ येथील महसूल भवनात जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची उधळण करीत जल्लोष केला गेला. निवडणूक निकालानंतर कोठेही काही अनुचित घटना घडली नाही. वडगावमध्ये निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावपातळीवरील ही निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर नसल्याने निकालानंतर सर्वच पक्षांकडून यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरपंच पदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभारात राजकीय वादंग अपेक्षित असले तरी जनतेतून सरपंच निवडून आल्यामुळे जोरदार जल्लोष करण्यात आला.

निवडणूक निकालानंतर कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र असले तरी निकालाचा कल पाहिल्यास ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. निकलादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ग्रामपंचायत विजयी उमेदवार आणि कंसात त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे : सुदवडी : सरपंच – रंजना बाळू शेंडे (405), प्रभाग 1 – रमेश छबन कराळे (159), सारिका अनिल वाळुंजकर (139). प्रभाग 2 – नितीन भानुदास साठे (116), संगीता राजेंद्र खेडेकर (112), प्रभाग – 3 नेहा नंदकुमार शिंदे (161), शीतल नितीन साठे (161), वैभव चंद्रकांत गाडे (152),
दिवड ग्रामपंचायत : सरपंच – पार्वती शंकर सावळे (689), प्रभाग -1 रंजना महादू पवार (207), सुनील सावळे (225), रंजना सावळे (218).प्रभाग – 2 प्रकाश बाबुराव राजीवडे (278), शीतल गणेश गाडे (258), रुपाली जालिंदर सावळे (259). प्रभाग 3 – अविनाश भगवान भालेराव (247), रोहिदास मारुती सावळे (248), सविता महिंद्र सावळे (248),
ओवळे ग्रामपंचायत : सरपंच – स्नेहा अशोक साठे (621), अश्‍विनी संदीप भालेराव (214), संदीप बबन साठे (216), प्रभाग -2 भानुदास नामदेव शिंदे (182). प्रभाग 3 – सोमनाथ नारायण इंगळे (278), सरस्वती सुरेश शिंदे (254), रितिका योगेश साठे (239).
कोंडीवडे (आंदर मावळ) ग्रामपंचायत : सरपंच – उर्मिला लक्ष्मण तळवडे (347). प्रभाग 1 – रेश्‍मा बाळू कडू (121). प्रभाग 3 – प्रभावती संजय तळवडे (178), गणेश बारकू लामगण (178).
कलहाट ग्रामपंचायत : प्रभाग 1 – प्रणाली अमोल आगीवले (149), रुपाली संतोष करवंदे (194).
काब्रे नामा ग्रामपंचायत : संगीता शिवाजी गायकवाड (253).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)