गाळ काढून विहिरीला पुनर्जीवन

वडगाव मावळ – एकेकाळी संपूर्ण परिसराची तहान भागवत असलेल्या विहिरीकडे लोकांनी गरज संपल्यावर दुर्लक्ष केले. जी विहीर कधी जीवनदायिनी होती, तिच्यातून दुर्गंध येईपर्यंत निर्माल्य व इतर कचरा टाकला. अनेक वर्षांपासून या विहिरीत गाळ साचला होता. अखेर या विहिरीतील गाळ काढून तिला पुनर्जीवन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वडगाव मावळ येथील महादेव मंदिराजवळील विहिरीतील अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून विहिरीला पुनर्जीवन देण्याचे काम नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर व नगरसेवकांच्या पुढाकारातून करण्यात आले. वडगाव- कातवी नगरपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान सुरू असून स्वच्छतेचे काम खऱ्या अर्थाने करण्यात आले.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ श्री महादेव मंदिर असून बाजूला जामा मस्जिद आहे. या परिसरात शिवकालीन विहीर आहे. शहरीकरण झाल्यावर त्या पाण्याचा वापर थांबला. त्या विहिरीत गणपती विर्सजन होऊ लागले व निर्माल्य टाकले जावू लागले. अनेक वर्षांपासून पाण्याचा उपसा होत नसल्याने पाण्याला तीव्र दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला होता. दुर्गधींचा त्रास परिसरातील नागरिकांनाही होऊ लागला होता. नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर व नगरसेवकांनी पुढाकार घेवून विहिरीतील अनेक वर्षांपासून साचलेला गाळाचा उपसा करून विहिरीला पुनर्जीवन दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)