गायक गुरू रंधावाला यास यूट्युबवर सर्वाधिक व्ह्यूज

टी-सीरिजचा गायक गुरू रंधावा याला यूट्युबवरील सर्व चॅनेल्सवर तीन बिलियनहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. अशारितीने गायक-रॅपर हनी सिंग आणि बादशाह यांना मागे सोडत गुरू रंधावा यूट्युबवर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला गायक ठरला आहे. चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल गुरूने सर्वांचे आभार मानले आहेत.

गुरुने “सूट सूट’, “हाय रेटेड गबरू’, “लाहोर’ आणि “बन जा तू मेरी राणी’ यासारखी हिटस्‌ गाणी गायली आहेत. याबाबत गुरूने म्हणाला, चाहत्यांनी मला दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार मानतो. मला वाटते भारतात पहिल्यांदा कोणत्या गायकाला यूट्युबवर तीन बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याचा गायक म्हणून मला खूप आनंद होत आहे. जगभरातील चाहत्यांना माझी गाणे आवडीने पाहिले, त्यांचे मी आभार मानतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरूच्या यशामध्ये टी-सीरिजचे चेअरमन भूषण कुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी गुरू रंधावा याला 2015मध्ये प्रथम “पटोला’ गाण्यासाठी करारबद्ध केले. त्यानंतर गुरु याने मागे वळून पाहिलेच नाही. दरम्यान, गुरु रंधावा याचे इंन्स्टाग्रामवर तब्बल 50 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावरून गुरुच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)